अहमदनगर Live24 टीम, 28 जुलै 2021 :- कोरोनाकाळात अनेकांना भरमसाठ विजेची बिले प्राप्त झाली होती. या मुद्द्यावरून अनेक आंदोलने झाली मात्र वीजबिले थकबाकी वसुलीसाठी महावितरणने आक्रमकपणा अंगीकारत थकबाकीदारांची वीज कनेक्शन तोडण्याची मोही हाती घेतली.
मात्र कोरोनामुळे आर्थिक संकट सापडलेल्या नागरिकांना वीजबिल भरण्यासाठी सवलत मिळावी अशी मागणी भाजपचे प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
मंत्रीमहादोय यांना पाठवण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, गेल्या दीड वर्षापासून करोना महामारीचा प्रत्येक जण आपापल्या परीने मुकाबला करीत आहे.
लॉकडाऊन मुळे दैनंदिन व्यवहार, नोकरी, रोजगार, स्वयं रोजगार, हातावर प्रपंच असणार्या वर्गाचे प्रचंड नुकसान झाले आहे. वीजबिल आकारणी प्रचंड प्रमाणात झालेले आहे. ही वीज बिले माफ व्हावी म्हणून आम्ही अनेक वेळा मागणी केलेली आहे.
वीज बिल भरणा करण्यावरून ग्राहक व अधिकारी यांच्यात रोष निर्माण होत आहे. हा रोष कमी व्हावा तसेच सध्याच्या आर्थिक अडचणीमुळे वीज बिलांचा भरणा करण्यासाठी तीन टप्प्याची सवलत मिळावी म्हणजे त्यांचा वीज ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळेल असेही कोल्हे म्हणाल्या.