नागरिकांनी आजार लपवू नये !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- कोरोनाची लक्षणे जाणवताच नागरिकांनी आजार न लपवता आरोग्याची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन नगरसेवक श्रीनिवास बिहाणी यांनी केले.

शहरातील प्रभाग क्रमांक १५ मध्ये कोरोनाचा रॅपिड टेस्ट कॅम्प नाथा पाटील मोरगे वस्ती येथे नुकताच पार पडला. यावेळी बिहाणी बोलत होते.

नगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पऱ्हे व आरोग्य कर्मचारी यावेळी उपस्थित होते. बिहाणी म्हणाले, की आजाराला न घाबरता आरोग्य तपासणी व लसीकरण करण्यासाठी लोकांनी सहभाग वाढवणे काळाची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

बिहाणी म्हणाले, की मोरगे वस्ती भागातील सुवर्ण पिंपळ या ठिकाणी कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे भागातील नागरिकांची कोरोना रॅपिड टेस्ट करण्यात आली.

त्यामध्ये १०८ नागरिकांची रॅपिड टेस्ट होऊन फक्त दोन जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले. त्यांना शहरातील स्व. जयंतराव ससाणे कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. कॅम्प यशस्वी करण्यासाठी सतीश पाटणी व श्रीनिवासभाऊ बिहाणी मित्र मंडळाचे कार्यकर्ते प्रयत्नशील होते.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24