भीतीपोटी लसीकरण करण्यास नागरिक तयार होणार नाही..

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 12 मे 2021 :- लसीकरणासाठी नागरिकांना रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्याची सक्तीचे करण्याचा निर्णय प्राथमिक आरोग्य केंद्राने सक्ती केल्याने हा निर्णय चुकीचा ठरणार आहे.

ही टेस्ट करताना नागरिकांची धडधड वाढून पल्स ठोके वाढू शकतात. परिणामी नागरिकांना कारण नसताना भीती वाढेल व या भीतीपोटी लसीकरण करण्यास नागरिक तयार होणार नाही. यामुळे अशी करणे चुकीचे ठरणार आहे, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.

नेवासे तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राना रॅपिड अँटीजेन टेस्टची सक्ती केल्याची माहिती दिली जात आहे. लसीकरण करण्यासाठी अजुनही काही भागात जनजागृती नसल्याने ग्रामीण भागातील नागरिक लसी घेण्यासाठी उत्सुक नाहीत. यामुळे कोरोना संक्रमण रोखण्यासाठी अडथळा येत आहे.

आणी आता लसीकरण करण्यापुर्वी जर रॅपिड अँटीजेन टेस्टची सक्ती केल्यास लसीकरण होणार तर नाहीच पण नागरिक ही टेस्ट भितीपोटी ही करणार नसल्याने शासनाचे लसीकरणाचे उदिष्ट सफल होणार नाही.

आरटी पीसीआर टेस्ट करण्यास नागरिक घाबरतात की आपण पाॅझिटिव्ह निघालो तर यामुळे नागरिक लस घेणार नाहीत असे चुकीचे निर्णय काढून नागरिकांत जास्त भीती निर्माण होईल.

कोणतीही टेस्ट न करता पूर्वी प्रमाणे लसीकरण करावे सर्व सामान्य नागरिकांना लसीकरण करण्यास प्राधान्य दिले पाहिजे अशी अपेक्षा काही नागरिकांनी केली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24