Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Citroen New Car : Kia चं टेन्शन वाढलं! पुढच्या महिन्यात लाँच होणार Citroen ची जबरदस्त SUV, पहा डिटेल्स

लवकरच आता Kia Seltos चे टेन्शन वाढू शकते. याचे कारणही अगदी तसेच आहे. कारण बाजारात लवकरच Citroen ची नवीन कार दाखल होत आहे.

Citroen New Car : Citroen ही फ्रेंच ऑटो कंपनी आहे. तरीही या कंपनीच्या सर्व कार्सना भारतीय बाजारात मोठी मागणी आहे. कंपनीच्या ग्राहकवर्गाची संख्या जास्त आहे. इतकेच नाही तर कंपनी सतत आपल्या नवनवीन आणि शानदार फीचर्स असणाऱ्या कार सादर करत असते.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

अशातच आता कंपनी आपली आगामी कार लाँच करण्याच्या तयारीत आहे. माहितीनुसार कंपनी पुढच्या म्हणजे एप्रिल महिन्यात आपली नवीन कार लाँच करणार आहे. लाँच झाल्यानंतर ही कार Kia Seltos ला जोरदार टक्कर देऊ शकते. जर तुम्ही नवीन कार खरेदी करणार असाल तर जरा थांबा.

कसे असणार सिट्रॉनचे नवीन डिझाइन

सिट्रॉनच्या डिझाईनबद्दल सांगायचे झाल्यास या नवीन कारची लांबी सुमारे 4 ते 5 मीटर असण्याची शक्यता आहे. तसेच या कारच्या समोर स्टायलिश ग्रिल आणि LED लायटिंगही देण्यात येऊ शकते. नवीन कारमध्ये सनरूफही पाहायला मिळणार आहे. असेही मानले जात आहे की नवीन कारमध्ये केबिन फीचर्स देखील खूप चांगले असू शकते.

पहा वैशिष्ट्ये

कंपनीच्या या आगामी कारच्या वैशिष्ट्यांवर नजर टाकायची झाली तर यात ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, अलॉय व्हील्स, रिअर पार्किंग कॅमेरा, ओआरव्हीएस, अप्रतिम पॅनोरॅमिक सनरूफ आणि अनेक अत्याधुनिक वैशिष्ट्ये असू शकतात.

असे असेल नवीन कार इंजिन

आगामी Citroën मध्ये कंपनी 1.2 लीटर टर्बो चार्ज केलेले पेट्रोल इंजिन देण्याची शक्यता आहे. हे इंजिन 110 Bhp पॉवर आणि 190 Nm पीक टॉर्क जनरेट करू शकते. तसेच हे इंजिन 6 स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनलाही जोडले जाऊ शकते. इतकेच नाही तर ही कार Kia Seltos ला थेट टक्कर देऊ शकते. किमतीबद्दल बोलायचे झाले तर कंपनीकडून अजूनही या कारची किंमत जाहीर करण्यात आली नाही.