अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :- काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ आणि गटबाजी न करता समाजकार्य अखेरपर्यंत करणारे भिंगार काँग्रेसचे अध्यक्ष स्व.आर.आर.पिल्ले किरण काळे यांच्या गटबाजीच्या कृतीत सामिल नव्हते म्हणून त्यांच्या निधनाकडे दुर्लक्ष केले आणि आता सावरण्याच्या प्रयत्नात खोटे दु:ख व्यक्त करतांना
पिल्ले परिवारात कोणी कोरोना बाधित असल्याची बदनामी शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे करत असल्याच्या कृतीचा जाहिर निषेध शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष शशिकांत पवार यांनी केला आहे.
वास्तविक अॅड.पिल्ले यांच्या दु:खद निधनानंतर ज्यांनी या घटनेची दखल घेतली नाही. ते पक्षहितापेक्षा गटबाजीत गुंदेले आहेत. कारण अंत्यसंस्कार ते दशक्रिया विधीपर्यंत ते कोठेही उपस्थित नव्हते.
या दरम्यान पिल्ले यांच्या घरी सांत्वनासाठीही ही येऊ शकले नाहीत. आणि आपले नेते राज्याचे नेते आहे, त्यांनाही आपण परिवारातील सदस्य कोरोना बाधित असल्याचे सांगून त्यांनाही अॅड.पिल्ले परिवाराच्या सांत्वनासाठी येऊ दिले नाही का?
असे पवार यांनी काळे यांना सवाल केला आहे. ना. थोरातांसह जिल्ह्यातील नेत्यांशी पिल्ले यांचा संपर्क होता. पिल्ले यांना नेते नावानिशी ओळखत होते. स्वातंत्र्य सेनानी रत्नम पिल्ले यांच्या कार्याचा काँग्रेसला आणि जनतेला अभिमानाच आहे.
परंतु गटबाजी करणार्यांनी अॅड. पिल्ले यांच्या निधनाच्या दुसर्या कि तिसर्या दिवशी नगर दक्षिण जिल्हा काँग्रेसची बैठकीतही श्रद्धांजली वाहण्यात आली नाही. आ.डॉ.तांबे या बैठकीला उपस्थित होते.
ना.थोरात यांच्या नगर दौर्यातही बैठक झाली, त्यातही हा विषय उपस्थित झाला नाही. याची खंत भिंगारचे रिजवान शेख यांनी देखील चर्चेत व्यक्त केली. कोरोनामुळे माजी खा.दिलीप गांधी यांचे निधन झाले.
तेथे मात्र अशी शंका उपस्थित न करता त्यांच्या घरी जावून सात्वंन करण्यात आले अर्थात ही कृती योग्यच आहे. गांधी यांच्यासारख्या नेत्याला श्रद्धांजली वाहणे, त्यांच्या परिवाराचे घरी जावून सात्वंन करण्यात आले तसे अॅड.पिल्ले यांच्या बाबतीत घडलो नाही, ही खरी खंत आहे.
एकीकडे पिल्ले यांच्या निधनाकडे दुर्लक्ष झाल्याची चूक स्पष्ट दिसत असतांना आता सावरण्याच्या प्रयत्नातही आपण पिल्ले परिवारातील सदस्य कोरोना बाधित असल्याचा आरोप करणे कितपत योग्य आहे?
असा सवाल शशिकांत पवार यांनी उपस्थित केला. वास्तविक अॅड.पिल्ले यांचे निधन झाले, त्या क्षणापासून पक्षाचे भिंगार व नगर येथील कार्यकर्ते, मित्र परिवार, भिंगारकर, समाजबांधव पिल्ले परिवाराच्या संपर्कात होता व आजही आहे.
त्यामुळे अंत्यसंस्कार ते दशक्रिया विधीपर्यंत सर्व सोपस्कार या सर्वांच्या उपस्थितीत संपन्न झाले. या सर्वांना कोरोनाची भिती नाही का? ज्यांनी कोरोनाची भिती व्यक्त केली, त्यांनी पक्ष बैठकीतही पिल्ले यांना श्रद्धांजली वाहिली नाही.
तेथेही कोरोनाची लागण झाली असती का? याबद्दल साधा उच्चारही 12 दिवसात झाला नाही ते आता खोटे दु:ख व्यक्त करत स्वत:चे राजकारण एवढे खालच्या पातळीवर असल्याचा दाखल देतात. याची किव वाटते असेही पवार म्हणाले.
हिंदू धर्मामध्ये व्यक्तीच्या निधनानंतर त्याच्याशी असलेलं शत्रुत्व नष्ट होते, असे मानले जाते. येथे तर पिल्ले साहेब तुमचे शत्रुही नव्हते. फक्त त्यांना तुमची गटबाजी पसंत नव्हती, त्यामुळे पिल्ले साहेब तुमच्या गटबाजीच्या कृतीत सहभागी नव्हते, त्याचा एवढा राग का?
पिल्लेंसारखे अनेक पक्ष सहकारी पक्षकार्य निष्ठेने करत आहे, त्यांनाही डावल्याची कृती आपण करत होता आणि करत आहात, यापैकी पिल्ले यांच्या निधनाकडे दुर्लक्ष हा एक प्रकार होता, एवढे मात्र खरे, असे पत्रकात शेवटी पवार यांनी नमुद केले आहे.