नगरकरांनो धोका वाढतोय ! आणखी पाच कंटेन्मेंट झोन जाहीर

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2021:-  नगर शहरात रूग्णांची संख्या वाढत असल्याने महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी उपाययोजनेचा एक भाग म्हणून जास्त रूग्ण असलेला परिसर सील करण्यास सुरूवात केली आहे.

शहरात आणखी पाच मायक्रो कंटेन्मेंट झोन जाहीर. एकूण झोनची संख्या आता पंधरा. केडगाव, बालिकाश्रम रोड आणि सावेडी उपनगरात नवीन पाच झोन जाहीर करण्यात आले आहे.

नगर शहरातील उपनगर भागातील सावेडीत तीन ठिकाणी सूक्ष्म कंटेन्मेंट झाेन झाल्यानंतर मंगळवारी आणखी चार सूक्ष्म कंटेन्मेंट झाेनची भर पडली.

बाेल्हेगाव येथे तीन झालेले पूर्वीचे असे सर्व झाेन पकडल्यास नगर शहरात आता सूक्ष्म कंटेन्मेंट झाेनची संख्या दहा वर पाेहाेचली होती.

यातच आता आणखी भर पडली असून आता 5 कंटेन्मेंट झोनची वाढ झाली आहे. यामुळे एकूण 15 कंटेन्मेंट झोन शहरात झाले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हा महापालिका प्रशासन सतर्क झाले आहे.

रूग्ण वाढल्याने संबंधित परिसर सील करण्याच्या हालचाली सुरू झाल्याने मायक्रो कंटेन्मेंट झोनची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24