file photo

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :- शहर पाणी पुरवठा योजनेवरील महत्वाच्या दुरुस्ती कामांसाठी आज मंगळवारी (दि.२१) सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत शटडाऊन घेण्यात येणार असल्यामुळे पुढील २ ते ३ दिवस शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे.

मुळानगर पंपींग येथुन शहरासाठीचा पाणी उपसा बंद राहाणार आहे. परिणामी शहर पाणी वितरणाच्या टाक्या भरता येणार नाही. त्यामुळे आज सकाळी ११ नंतर पाणी वाटपाच्या बोल्हेगांव, नागापुर,

पाईपलाईन रोड, निर्मलनगर, सुर्यनगर, लक्ष्मी नगर, मुकूंदनगर, केडगांव, नगरकल्याण रोड परिसर, इ. नागरी भागास पाणी पुरवठा होणार नसुन तो उद्या बुधवारी (दि.२२) करण्यात येईल.

तसेच उद्या रोटेशन नुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागास उदा.सिद्धार्थ नगर, लाल टाकी, दिल्लीगेट, नालेगांव, तोफखाना, चितळेरोड, आनंदी बाजार, खिस्त गल्ली, पंचपीर चावडी, माणिक चोक, कापडबाजार, नवीपेठ,

माळीवाडा (काही भाग), बालीकाश्रम रोड, सावेडी, स्टेशन रोड, आगरकर मळा, विनायक नगर, इ. भागात पाणी पुरवठा होणार नसुन तो गुरुवारी (दि.२३) करण्यात येईल.

त्याच प्रमाणे गुरुवारी (दि.२३) रोटेशन नुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मंगलगेट, रामचंद्र खुंट, कोठला, झेंडीगेट, कचेरी परिसर, दाळमंडई, धरतीचौक, माळीवाडा, बंगाल चौकी, इ. भागासह गुलमोहोर रोड, प्रोफेसर कॉलनी परिसर,

सिव्हील,प्रेमदान, टि. व्ही.सेंटर हाडको, सारसनगर व बुरुडगांव रोड या भागाचा पाणी पुरवठा गुरुवार ऐवजी शुक्रवारी (दि.२४) करण्यात येईल.

तरी नागरिकांनी असलेल्या पाण्याचा वापर काटकसरिने करावा व महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापौर रोहीणीताई शेंडगे व आयुक्त शंकर गोरे यांनी केले आहे.