नगरच्या पोलिसांनी बीडच्या चोरट्याला औरंगाबाद मध्ये पकडले

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :- औरंगाबाद जिल्ह्यातील पळशी येथील समृद्धी महामार्गाच्या सिमेंट काँक्रीट प्लॅट सुपरवायझरला हाताशी धरून सिमेंटची बाहेर विक्री करणार्‍या गणेश अंबादास खेडकर (वय 32 रा. खुपटी ता. शिरूर जि. बीड) यास नगर एलसीबीच्या पथकाने अटक केली.

आरोपी गणेश खेडकर सह सुपरवायझर विक्रम देव सावंत विरूद्ध चिखलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, नगर तालुक्यातील अकोळनेर ते भोरवाडी रस्त्यावर एक टँकर संशयितरित्या उभा असल्याची खबर पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती.

पोलिसांनी टँकरची तपासणी केली असताना टँकरमध्ये कोणीच आढळून आले नाही. टॅंकरचा ड्रायव्हर अकोळनेर गावात मिळून आला. त्याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्याने सांगितले की, समृद्धी महामार्गाच्या पळशी येथील सिमेंट काँक्रीट प्लॅट सुपरवायझरला हाताशी धरून सिमेंटची बाहेर विक्री करण्यात येत आहे.

पोलिसांनी एका आरोपीसह सुपरवायझर विक्रम देव सावंत विरूद्ध चिखलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलिसांनी आरोपी खेडकर याच्याकडून दोन लाख पाच हजार 521 रूपये किंमतीचे सिमेंट व टँकर असा मुद्देमाल जप्त करून चिखलठाणा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

हि कारवाई एलसीबीचे सहायक निरीक्षक सोमनाथ दिवटे, सहायक फौजदार नानेकर, पोलीस कर्मचारी भाऊसाहेब काळे, विजयकुमार वेठेकर, शंकर चौधरी, रवी सोनटक्के यांच्या पथकाने ही कारवाई केली.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24