नगर शहर फाईव्ह स्टार मानांकनासाठी सज्ज

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:-केंद्र सरकारच्या भारत स्वच्छ अभियान व राज्य सरकारचे माझी वसुंधरा अभियानाचे मनपाने संपूर्ण तयारी पूर्ण केली असून. आपले शहर आता फाईव्ह स्टार मानांकनासाठी सज्ज झाले आहे.

लवकरच कोणत्याही दिवशी केंद्र व राज्य सरकारचे पथक शहरात येऊन पाहणी करेल. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचे प्रकल्प अधिकारी हर्षा नारखडे यांनी पूर्व तयारी म्हणून पाहणी केली.

अहमदनगर महापालिकेने या अभियानत भाग घेतला असून, नागरिकांच्या सहकार्यातून आपण भारत स्वच्छ अभियानामध्ये फाईव्ह स्टार मानांकन नक्कीच मिळवू. असा विश्वास व्यक्त केला.

नारखडे यांनी सार्वजनिक स्वच्छता गृहाची पाहणी केली. याचबरोबर भाजी बाजारातील नागरिकांशी विविध प्रश्न विचारून चर्चा केली. तरी शहरातील नागरिकांनी समाधानकारक उत्तरे देऊन महापालिकेला सहकार्य करावे.

याचबरोबर रस्त्यावर कोणीही कचरा टाकू नये. नगर शहर हे स्वच्छ सुंदर व हरित करण्यासाठी लोकसहभागाची खरी गरज आहे. महापालिकेचे कर्मचारी आपली जबाबदारी सक्षमपणे पार पाडत आहे.

तरी नगरकरांकडून सहकार्याची अपेक्षा आहे, अशी माहिती स्वच्छता निरीक्षक के. के. देशमुख यांनी दिली. यावेळी प्रकल्प अधिकारी राहुल अहिरे, राजेंद्र सामल, लक्ष्मण लांडगे आदी उपस्थित होते.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

 

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24