महाराष्ट्राच्या महागायिका म्हणून विजेत्या ठरलेल्या नगरच्या सन्मिता धापटे-शिंदे यांचा नागरी सत्कार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- सुर नवा ध्यास नवा. या कलर्स मराठी वाहिनीवरील चौथ्या परवाच्या आशा उद्याची या रिॲलिटी शोच्या प्रतियोगिताच्या अंतिम सोहळ्यात महाराष्ट्राच्या महागायिका म्हणून विजेत्या ठरलेल्या अहमदनगरच्या सन्मिता धापटे-शिंदे यांचा श्री.साई द्वारका सेवा ट्रस्ट व आय लव नगरच्या वतीने नागरी सत्कार करताना

पद्मश्री.पोपटराव पवार समवेत प्रसिद्ध मराठी गायक अवधूत गुप्ते, आमदार संग्राम जगताप, माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते, नगरसेवक अँड.धनंजय जाधव, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रा.माणिक विधाते, भगवानराव पाचपुते, बॉईजथ्री या चित्रपटाचे निर्माते शिंदे, शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते, व्याख्याते गणेश शिंदे आदी उपस्थित होते.

पद्मश्री.पोपटराव पवार म्हणाले की महीलेला पाठबळ दिले तर ते उंचीवर जाते त्यामुळे जीवनामध्ये ध्‍यास घेतला तरच मिळतो या हेतूने संधी मिळाली तर त्या संधीला कुटुंबातून पाठबळ मिळाले तर खूप मोठ्या उंचीवर जाण्यास मिळते याच संधीचे सोनं करत महागायिका सन्मिता धापटे-शिंदे यांना हा आज मान सन्मान मिळाल्याबद्दल अभिनंदन व्यक्त करत शुभेच्छा दिल्या.

तर आ.संग्राम जगताप म्हणाले की नगर शहराच्या मातीतून पाठबळ देण्याचे कार्य आम्ही केले व मतदान देण्यास जनजागृती केले व त्यांनी त्यांच्या आवाजाच्या जोरावर सादरीकरण करत त्यांची महागायिका म्हणुन निवड करण्यात आली नगरचा नाव अधिक उंचीवर घेऊन जाण्यासाठी हा आवाज जिल्ह्यातून बाहेर गेले

राज्यात आले व राज्यातून बाहेर देशात जायला पाहिजे अशी भावना जगताप यांनी व्यक्त करत शुभेच्छा दिल्या तर प्रसिद्ध मराठी गायक अवधूत गुप्ते म्हणाले की गावाकडच्या माणसाला गाव आसते मुंबईकर व पुणेकरांना गावच नसतो त्यामूळे गावाच्या लोकांचा कौतुक पाहण्यास आलो व जजीग करत असताना फार कमी लोकांचा प्रवास मी इतक्या थोड्या काळात इतका मोठा प्रवास करणारे फार कमी लोक पाहिले

त्यामध्ये सन्मिता धापटे-शिंदे हे एक आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमोल खोले, मितेश शहा, किरण गवते, तुषार अंबाडे, जनार्धन लिपाने, अमित घाडगे, सोनू बोरुडे आदींनी परिश्रम घेतले तर सूत्रसंचालन प्रसाद बेडेकर यांनी केले तर आभार राहुल मुथा यांनी मानले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24