Cleaning Tips : पावसाळ्यात दूषित पाण्याचे प्रमाण वाढते. इतकेच नाही तर याच दिवसात डास, किडे, माश्यांचा उपद्रव वाढतो . त्यामुळे जर आपण घराची साफसफाई केली नाही तर आजारांचे प्रमाण वाढते. खासकरून पाण्याची टाकी स्वच्छ ठेवली नाही तर नकळत आपण अनेक आजारांना निमंत्रण देतो.
जर तुम्हाला तुमची पाण्याची टाकी स्वच्छ करायची असेल तर तुम्ही त्यासाठी काही ट्रिक्स वापरू शकता. त्यामुळे तुम्हाला प्लबंरलाही बोलवावे लागणार नाही. घरबसल्या तुम्ही फक्त 5 मिनिटात टाकी स्वच्छ करू शकता. कसे ते जाणून घ्या.
1. हायड्रोजन पेरोक्साईड
हायड्रोजन पेरोक्साईड हे एक विशेष प्रकारचे रसायन असून ज्याचा वापर टाकी स्वच्छ करण्यासाठी होतो. इतकेच नाही तर ते रासायनिक पाण्याने पाईपलाईन आतून स्वच्छ करण्याचे काम करते, याच्या मदतीने बॅक्टेरिया वाढत नाहीत.आपल्याला 200 लिटर पाणी आत ठेवून त्यात हे हायड्रोजन पेरॉक्साइड टाका, पाण्याच्या संपर्कात येताच त्याची प्रतिक्रिया सुरू होते. टाकीमध्ये हे हायड्रोजन पेरॉक्साइड काही काळ तसेच राहू द्या. त्यानंतर घरातील सर्व नळ सुरु करून हे पाणी काढून टाका.
2. ब्लीचिंग पावडर
ब्लीचिंगने टाकी पूर्णपणे स्वच्छ होते. त्यासाठी तुम्हाला 50 ग्रॅम ब्लीचिंग पावडरची गरज लागणार आहे. या टाकीमध्ये थोडे पाणी शिल्लक ठेवा, नंतर त्यात ब्लीचिंग पावडर मिसळून ते काही वेळ सोडा. सर्व घाण खालच्या पृष्ठभागावर स्थिर होते. त्यानंतर सर्व घाण पाणी काढून टाका.
3. तुरटी
इतकेच नाही तर तुम्ही तुरटीचा वापर करू शकता. एका मग पाणी घेऊन त्यात तुरटी मिसळा, मग ते द्रावण टाकीच्या पाण्यात टाका. त्यानंतर टाकीच्या सभोवतालची आणि पृष्ठभागावरील सर्व घाण एका झटक्यात साफ करण्यात येईल.
4. अॅसिड
हे लक्षात घ्या की ऍसिडचा वापर टाकी किंवा पाइनला हानी पोहोचवत नाही. टाकीमध्ये फार कमी पाणी सोडा आणि त्यात हे अॅसिड टाका. जे सर्व घाण काढून टाकू शकते. तसेच तुम्ही नंतर नळाच्या मदतीने टाकीमधून बाहेर काढले जाऊ शकते.