मान्सून आगमनापूर्वीच शहरातील ओढ्या-नाल्यांची साफसफाई सुरू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :- मान्सून काही दिवसांवर येऊन ठेला आहे. या पार्श्वभूमीवर अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने शहरामध्ये विविध ठिकाणी ओढ्या-नाल्यांची साफसफाई सुरू केली.

यंदा मोठ्या प्रमाणात पावसाचा अंदाज हवामान खात्याच्या वतीने वर्तवण्यात आला आहे, पडलेल्या पावसाचे पाणी सोईस्कर रित्या वाहून जावे यासाठी महापालिकेच्या वतीने शहरात उपाययोजना करण्यात येत आहे.

दरम्यान दरवर्षी पावसाळ्यामध्ये पाण्यामुळे नाले तुंबत असत. यामुळे नाल्यामधील कचरा रस्त्यावर साचून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची चिन्हे निर्माण होत असते.

याच पार्श्‍वभूमीवर मान्सून आगमनापूर्वीच शहरातील ओढ्या-नाल्यांची साफसफाई सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान आज भिंगार नाला साफसफाई कामाची पाहणी स्थायी समिती सभापती अविनाश घुले यांनी केली अविनाश घुले म्हणाले, शहरातील ओढे नाल्यांची व गटरीची साफसफाई होणे गरजेचे आहे.

जेणेकरून पावसाचे पाणी वाहून जाण्यास मदत होईल जर वेळेत साफसफाई झाली, नाहीतर नागरिकांच्या घरामध्ये पावसाचे पाणी घुसून आर्थिक नुकसान होऊ शकते.

तसेच नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो व शहरांमध्ये साथीचे आजार पसरू शकतात यासाठी शहरातील ओढे- नाल्यांची व गटारीची साफसफाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24