Bank Closing Tips : आता बँकेत खाते असणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कारण जर तुम्ही बँकेत खाते चालू करत असाल तर त्याच्याशी निगडित सर्व नियम तुम्हाला माहिती असावेत. नाहीतर तुम्ही कधीही आर्थिक संकटात सापडू शकाल.
तसेच जर तुम्ही तुमचे बँक खाते बंद करत असाल तर त्या अगोदर त्याचे नियम जाणून घ्या. नाहीतर तुम्हाला नंतर समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. बँक खाते बंद करण्यापूर्वी कोणत्या गोष्टी जाणून घ्याव्यात ते सविस्तर जाणून घेऊयात. त्यासाठी बातमी शेवटपर्यंत काळजीपूर्वक वाचा.
लक्षात ठेवा या गोष्टी
क्रमांक १
जर तुमची बँकेत एकापेक्षा जास्त खाती असतील तसेच तुम्हाला काही कारणामुळे त्यापैकी एक बँक खाते बंद करायचे असेल, तर ते एक वर्षापूर्वी ते बंद करू नका. जर तुम्ही असे केले तर बँक तुमच्याकडून क्लोजिंग चार्ज घेते.
जर तुम्ही खाते उघडले तर तुम्हाला बँकेकडून 14 दिवस मिळतात. यात तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ते बंद करू शकता.
क्रमांक २
खाते बंद करण्याच्या वेळेस जर तुमच्या बँक खात्यात 20,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा असेल, तर नियमानुसार तुम्हाला फक्त 20,000 रुपये रोख मिळतात. आणि उरलेली रक्कम बँक तुमच्या इतर बँक खात्यात ट्रान्सफर करते. त्यामुळे दुसरे बँक खाते असणे खूप गरजेचे आहे.
क्रमांक ३
बँकेत खाते चालू करण्यापूर्वी अटी आणि शर्ती जाणून घ्या. कारण काही वेळा बँक खाते बंद करण्यासाठी काही अटी असतात. जर तुम्हाला हे अगोदरच माहीत असेल तर तुम्हाला कुठे आणि किती शुल्क भरावे लागेल आणि ते कसे वाचवता येऊ शकते हे तुम्हाला समजेल.