अहमदनगर Live24 टीम, 11 मे 2021 :-दिवसेंदिवस वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन घोषीत केला आहे. या दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
लॉकडाऊनच्या काळात कापडाचे दुकान उघडे ठेवुन व्यवसाय केल्याबद्दल पाथर्डी येथील के.एच.गांधी या दुकानदाराला पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दहा हजाराचा दंड ठोठावला आहे.
सध्या देशभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. शहरासह ग्रमीण भागातदेखील आता कोरोनाचे मोठ्या प्रमाणात रूग्ण वाढत आहेत.
त्यामुळे अनेक भागात लॉकडाऊन घोषीत केले आहे.या दरम्यान गर्दी रोखण्यासाठी सर्वच सेवा बंद ठेवण्यात आलया आहेत.
या काळात जे व्यावसायिक शासकीय आदेशाचा भंग करतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.
सोमवारी पाथर्डी शहरातील के.एच.गांधी हे कापडाचे दुकान सुरु असल्याचे गस्तीवर असणाऱ्या पालिकेच्या पथकातील कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले.
त्यांनी दुकानाचा दरवाजा उघडला असता आतमध्ये ग्राहक कापड खरेदी करत होते. त्यांनी दुकानदार गांधी यांना लॉकडाऊनच्या काळात दुकान चालु ठेवल्याबद्दल १० हजाराचा दंड केला.