ताज्या बातम्या

ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यात रब्बी हंगामातील पेरण्याचा वेग मंदावला

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :- आधी परतीचा, त्यानंतर अवकाळी पावसाने तडाखा दिल्यानंतर गेल्या काही दिवसांपासूनचे ढगाळ वातावरण यामुळे रब्बी हंगामातील पेरण्याचा वेग मंदावला आहे.(Ahmednagar news)

एकीकडे हि परिस्थिती असली तरी दुसरीकडे मात्र जिल्ह्यात 8 दिवसांत 50 हजार हेक्टरच्या जवळपास पेरण्या झाल्याने पेरण्याची एकूण आकडेवारी ही 5 लाख 62 हजार हेक्टरपर्यंत पोहचली आहे.

यंदा परतीच्या पावसाच्या दणक्यामुळे जिल्ह्यात धिम्म्या गतीने रब्बी हंगामातील पिकांच्या पेरण्या सुरू आहेत. मात्र, ज्वारी पेरणीचा 15 ऑक्टोबरचा कालावधी संपल्यानंतर मोठ्या प्रमाणात ज्वारीची पेरणी झालेली आहे.

ज्या शेतकर्‍यांची शेती विहीर बागायत अथवा पाण्याचे अन्य स्त्रोत उपलब्ध आहेत, त्यांनी उशीराच्या ज्वारी पिकाच्या पेरणीला पसंती दिली. जिल्ह्यात अनेक भागात उशीर पेरणी झालेल्या ज्वारी पिकावर जिल्ह्यात अनेक ठिकाणी चिकटा या रोगाचा प्रार्दभाव झालेला दिसत आहे.

यंदा अवकाळी पावसामुळे ज्वारी पिकचे क्षेत्र कमी होवू शेतकरी कांदा पिकाकडे वळाले आहे. यामुळे ज्वारीचे क्षेत्र 1 लाख 84 हजार 363 हेक्टरपर्यंत पाहचले आहे.

दुसरीकडे गव्हाच्या पेरणीचे क्षेत्र वाढत असून आतापर्यंत सरासरीच्या 55 हजार 300 हेक्टरवर गव्हाची पेरणी झालेली आहे. पेरणीची टक्केवारी 97 टक्के आहे. यासह हरभरा पिकाची पेरणी 68 हजार 371 हेक्टरपर्यंत पोहचली असून पेरणी टक्केवारी ही 45 टक्के झाली आहे.

Ahmednagarlive24 Office