अहमदनगर Live24 टीम, 9 ऑगस्ट 2021 :- रविवारी मुख्यमंत्र्यांनी नागरिकांशी संवाद साधून सर्वसामान्यांना लोकल सुरु करण्यासह अनेक महत्वाच्या मुद्यांवर भाष्य केलं. मात्रं प्रार्थनास्थळं, रेस्टॉरंट, मॉल्स उघडण्याबाबत अद्याप काही निर्णय घेण्यात आलेला नाही.
याबाबत आज निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान मुख्यमंत्री ठाकरे यांनी सात दिवसांवर येऊन ठेपलेल्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतांना नागरिकांनी संयम बाळगावा, गर्दी करू नये, कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून कोरोनाला हरवण्याची जिद्द मनात कायम ठेवावी असे आवाहन केले.
मुख्यमंत्री ठाकरे रात्री 8.30 वाजता कोविड टास्क फोर्ससोबत बैठक करणार आहेत. या बैठकीनंतर यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे. हॉटेल्सला देखील रात्री 10 वाजेपर्यंत परवानगी मिळावी यासंदर्भात आजच्या टास्क फोर्सच्या बैठकीत भूमिका मांडणार असल्याचं मंत्री अस्लम शेख यांनी म्हटलं आहे.
यांना रेल्वे प्रवासाची मुभा 15 ॲागस्टपासून कोविडचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवास करता येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल याबाबत घोषणा केली.
ज्या प्रवाशांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तसेच दुसरा डोस घेऊन 14 दिवस झाले असतील त्यांना 15 ऑगस्ट पासून उपनगरीय रेल्वेमधून प्रवास करण्यास मुभा देण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.