ताज्या बातम्या

CNG Car Tips : जुनी सीएनजी कार खरेदी करताय? तर मग लक्षात ठेवा ‘या’ तीन महत्त्वाच्या गोष्टी

CNG Car Tips : भारतीय बाजारात दरवर्षी लाखो कारची विक्री होते तसेच लाखो कार बाजारात येत असतात. अशातच आता पुढच्या महिन्यापासून म्हणजेच एप्रिलपासून या कारच्या किमतीत वाढ होणार आहे. त्यामुळे आता ग्राहकांना नवीन कार खरेदी करण्यासाठी पूर्वींपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.

इतकेच नाही तर बाजारात वापरलेल्या कारची खरेदी विक्री करण्याचे प्रमाणही वाढले आहे. जर तुम्हीही जुनी सीएनजी कार खरेदी करत असाल तर काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, नाहीतर तुम्ही खूप मोठ्या आर्थिक अडचणीत येऊ शकता.

1. बारकाईने परीक्षण करणे गरजेचे

जर तुम्ही वापरलेली सीएनजी कार खरेदी करत असाल तर, त्या वाहनाची पूर्ण तपासणी करणे खूप गरजेचे आहे. जर कारमध्ये आफ्टरमार्केट सीएनजी किट बसवलेले असेल तर, गॅस लीक तपासणे खूप गरजेचे आहे. इतकंच नाही तर सिलेंडरच्या गुणवत्तेशी तडजोड होणार नाही याची विशेष काळजी घ्या. तसेच भविष्यात संभाव्य समस्या टाळण्यासाठी तज्ञांकडून इंजिन ट्यूनिंग आणि सीएनजी किट तपासणे महत्त्वाचे ठरू शकते.

2. फॅक्टरी फिट कारची निवड करावी

हे लक्षात ठेवा की पैशांची बचत करण्याच्या नावाखाली सुरक्षिततेशी कधीही तडजोड करू नका. त्यामुळे आफ्टरमार्केट सीएनजी किट खरेदी करण्यापेक्षा नामांकित कंपनीकडून फॅक्टरी फिटेड सीएनजी किट असणारी कार कधीही खरेदी करत जा. कारण या मोठमोठ्या कंपन्या ग्राहकांच्या सुरक्षिततेची खात्री करत असताना इंजिनच्या आरोग्याची आणि मायलेजचीही विशेष काळजी घेत असतात. तसेच आता हे लक्षात ठेवा की तुमचे जीवन मौल्यवान असून त्यात तडजोड करू नका.

3. इंधन भरत असताना काळजी घेणे आवश्यक

देशात मागील काही दिवसांपूर्वी सीएनजी कारमध्ये इंधन भरत असताना स्फोटाच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे सीएनजी वाहनात इंधन भरत असताना आवश्यक ती खबरदारी घ्या. सीएनजी स्टेशनवर इंधन भरत असताना कार पार्क करून सुरक्षित अंतरावर राहण्याचा सल्ला देण्यात येतो. इतकेच नाही तर जेव्हा शक्य असल्यास तेव्हा सिलिंडर गळतीची तपासणी जरूर करून घ्या.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts