CNG from dung : आत्तापर्यंत तुम्ही गोठ्यातुन दूध निघताना पाहिलं असेल. यापेक्षाही अधिक म्हणजे तुम्ही दुग्धजन्य पदार्थ बनवताना पाहिले असतील. पण, राजस्थानमध्ये (Rajasthan) गोठ्यात चक्क सीएनजी (CNG) बनवण्यात येत आहे. गोठ्यात सीएनजी तयार करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
जयपूर (Jaypur) येथील हिंगोनिया गोशाळेत शेणापासून सीएनजी (CNG from dung) बनवण्याचा प्लांट पूर्ण झाला आहे. पेट्रोलियम मंत्रालयाची मंजुरी मिळताच हा प्लांट सुरू केले जाईल. मित्रांनो खरं पाहता, इंडियन ऑइलने जयपूर, राजस्थानमध्ये कॉम्प्रेस नॅचरल गॅस (CNG) प्लांट उभारला आहे.
राजस्थानमधील हा सर्वात मोठा प्लांट असेल, असा दावा केला जात आहे. यामध्ये शेणापासून दररोज 6 हजार किलोपर्यंत सीएनजी तयार होणार आहे. जयपूरमधील हिंगोनिया गाय पुनर्वसन केंद्राच्या जमिनीवर हा प्लांट बांधण्यात आला आहे. यासाठी सुमारे 31.78 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
या प्लांटची खास गोष्ट म्हणजे ते पूर्णपणे ऑटोमॅटिक असेल. यामध्ये, शेण उतरवल्यानंतर पुढील संपूर्ण प्रक्रिया स्वयंचलित होईल. सीएनजी बनवण्यापासून ते साठवण्यापर्यंतच्या कामासाठी मनुष्यबळाची गरज भासणार नाही. गॅस बलूनमध्ये साठवले जाईल या संपूर्ण प्लांटमध्ये 8 लहान-मोठ्या टाक्या आणि 2 गॅस बलून आहेत.
त्यात बसवलेल्या दोन प्री-डायजेस्टर प्लांटमध्ये शेण आणि पाणी मिसळले जाते. त्यानंतर संपूर्ण प्रक्रिया स्वयंचलित होते. उत्पादित सीएनजी येथे बसविण्यात आलेल्या दोन गॅस बलून टाक्यांमध्ये साठवले जाईल. या टाक्यांमध्ये वायूचे शुद्धीकरण आणि कॉम्प्रेशनचे काम केले जाणार आहे.
2 वर्षांपूर्वी काम सुरू झाले :- इंडियन ऑइल कंपनीने सीएसआर फंड अंतर्गत हा प्लांट उभारण्याचे काम 2 वर्षांपूर्वी 2020 मध्ये सुरू केले होते. या प्लांटमध्ये विहित प्रमाणात शेण आणि पाणी मिसळण्याच्या खड्ड्यात मिसळले जाईल. प्री-डायजेस्टर टँकमध्ये हे द्रावण घेऊन तेथे जिवाणूंद्वारे सीएनजी बनवण्याची प्रक्रिया अवलंबली जाणार असल्याचे सांगितले जातं आहे. येथून सीएनजी सिलिंडरमध्ये भरून बाजारात वितरित केले जाणार आहे.