अहमदनगर Live24 टीम, 12 फेब्रुवारी 2021:-जिल्हा बँंकेला पूर्वीपासून मोठी परंपरा आहे. सहकारात राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून काम केले पाहिजे. प्रत्येक ठिकाणी राजकारणच केले पाहिजे असे नाही. राजकाणापलिकडे जाऊन संस्था चालविल्या गेल्या पाहिजेत.
असे प्रतिपादन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. तसेच पुढे बोलताना थोरात म्हणाले कि, बँकेच्या निवडणुकीसाठी बर्याच ठिकाणी मेळ घालण्याचा प्रयत्न केला.
यासाठी अकोले, श्रीरामपूर आणि कोपरगाव याठिकाणी एकत्र बसून निर्णय घेण्यात आल्याने त्या जागा बिनविरोध झाल्या आहेत. जिल्हा बँक शेतकरी आणि साखर कारखानदारीसाठी महत्वाची संस्था असल्याचे मंत्री थोरात यांनी यावेळी आर्वजून सांगितले. या ठिकाणी आमच्या पॅनलचा अध्यक्ष होईल, मात्र उमेदवार आताच सांगता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.