कॉकटेल ट्रीटमेंटमुळे कोरोनाचा धोका कमी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :-  मोनोक्लोनल अँटिबॉडी उपचारांमध्ये (अँटिबॉडी कॉकटेल) कॅसिरिव्हीमॅब आणि इम्डेव्हिमॅब या दोन औषधांचा संयोग साधला जातो.

सौम्य ते मध्यम स्वरूपाच्या लक्षणांवर घरीच उपचार घेणाऱ्या (होम आयसोलेशनमध्ये) रुग्णांसाठी भारतीय औषध महानियंत्रकांनी मे महिन्यात या औषधांना मंजुरी दिली आहे.

औषधांचे कॉम्बिनेशन असलेल्या मोनोक्लोनल अँटिबॉडी कॉकटेलचा वापर सर्वप्रथम अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर ऑक्टोबर २०२० मध्ये करण्यात आला होता. या उपचाराची निष्पत्ती आशादायक होती.

डॉक्टरांनी याचे वर्णन “कोविड-१९ आजारावरील पहिला खरोखरीचा उपचार” असे केले होते. कॅसिरिव्हीमॅब आणि इम्डेव्हिमॅब ही औषधे सार्स-सीओव्ही-टू स्पाइक (एस)

ग्लायकोप्रोटिनवरील नॉन-ओव्हरलॅपिंग एपिटोप्सना वेगळे करतात आणि त्यांना एसीई-टू रिसेप्टर्सशी आंतरक्रिया करण्यापासून रोखतात.

त्यामुळे विषाणू पेशींमध्ये प्रवेश करू शकत नाही. मग रोगप्रतिकारयंत्रणा विषाणू/अँटिबॉडी कॉम्बिनेशन दूर करते. या संयुक्त उपचारांच्या (१.२ ग्रॅम कॅसिरिव्हिमॅब आणि इम्डेव्हिमॅब) एका आयव्ही इन्फ्युजनमुळे,

सौम्य ते मध्यम लक्षणे जाणवणाऱ्या व लक्षणे तीव्र होण्याचा धोका प्लासिबोच्या तुलनेत अधिक असलेल्या कोविड-१९ रुग्णांमधील, रुग्णालयात दाखल होण्याचा किंवा मृत्यूचा धोका ८० टक्क्यांपर्यंत खाली आला, असे क्लिनिकल चाचण्यांत दिसून आले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24