अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2021:-अकोले तालुक्यातील वाशेरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी किरण गजे व उपसरपंचपदी अनिता गजे या पतीपत्नीची निवड करण्यात आली.
ग्रामपंचायतीच्या दोन्ही प्रमुख पदावर पती व पत्नीची निवड होण्याचा हा प्रकार दुर्मिळच असला पाहिजे. गजे दाम्पत्याची नुकत्याच झालेल्या बैठकीत निवड करण्यात आली.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी शिवराम डगळे व त्यांना सहायक म्हणून ग्रामसेविका नीलम शिंदे यांनी कामकाज पाहीले.
राजकारणात केव्हा काय होईल हे सांगता येत नाही. मात्र जिद्द व चिकाटीच्या जोरावर या जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही, याची प्रचिती वाशेरेकरांना आली.
एखाद्या गावचे सरपंच, उपसरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्य होणे मोठे मुश्किल असते; मात्र अशा स्थितीत किरण जयराम गजे या तरुण पदवीधराने सरपंचपद तर हस्तगत केलेच,
शिवाय पदवीधर पत्नी अनिता यांना बिनविरोध उपसरपंचपदी बसवून विरोधकांना चितपट केले.
अकोले तालुक्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील – जाणाऱ्या वाशेरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी व उपसरपंचपदी पती- पत्नी दोघांनीही सरपंच व उपसरपंचपदाचा मान मिळवत त्यांनी इतिहास घडविला आहे.