अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :- कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आरोळे हॉस्पिटलच्या प्रांगणामध्ये आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून तातडीने भव्य तंबू ठोकून दोनशे रुग्णांची व्यवस्था करण्यात येणार आहे.
या जागेवर शुक्रवारी पंचायत समितीचे सभापती सूर्यकांत मोरे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. जामखेड तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. सध्या ३५० रुग्ण उपचार घेत आहेत.
त्यामुळे बेड कमी पडत आहेत. अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधी या नात्याने आमदार रोहित पवार यांनी आरोळे हॉस्पिटलच्या मालकीच्या जागेत मागील बाजूस तातडीने दोनशे कोरोना रुग्णांची व्यवस्था होईल, असा मोठा तंबू टाकण्यात येणार आहे.
यामध्ये वेगवेगळ्या खोल्या तयार करण्यात येणार आहेत. खाट, गादी असे बेड तयार केले जाणार आहेत. त्याचप्रमाणे शौचालयांची व बाथरूमची व्यवस्था करण्यात येणार आहे.
ही सर्व व्यवस्था आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. आरोळे हॉस्पिटलचे संचालक डॉ. रवी आरोळे व डॉ. शोभा आरोळे यांनी आजपर्यंत सेवा करत आहेत.
तसेच यापुढे देखील या दोनशे रुग्णांची व्यवस्था होणे कामी आपले सर्व कर्मचारी सेवा करत आहे. जेवण आॅक्सीजनची व्यवस्था करणार आहेत.
नागरिकांनी मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन येथील कर्मचारी सुलताना शेख यांनी केले.