आ. निलेश लंकेे यांच्या लोकप्रियतेमुळे खा. सुजय विखे धास्तावले !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 16 जुलै 2021 :-आमदार नीलेश लंके पुढील लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात प्रबळ उमेदवार असतील, या शक्यतेने खासदार डॉ. सुजय विखे धास्तावले आहेत.

त्यामुळेच ते आ. लंके व कर्जत-जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांच्यावर बिनबुडाची टिका करत असल्याचे सांगत आ. नीलेश लंके समर्थक दादा शिंदे व कारभारी पोटघन मेजर यांनी प्रतिउत्तर दिले आहे.

कोरोना काळात आ. लंके यांनी जीवावर उदार होऊन आपल्यापेक्षा एक पाऊल पुढे टाकत शरदचंद्र पवार महाकोविड सेंटरच्या माध्यमातून परदेशासह देशात व राज्यात आदर्श काम उभे केले असल्याचे संदीप चौधरी व भाऊ चौरे यांनी म्हटले आहे.

आ. लंके कोरोना संकटकाळात करीत असलेल्या कामाची दखल केवळ राज्याने नव्हे तर देशाने घेतली.उत्तर प्रदेशातील भाजप सरकारने आ. लंके यांच्या कामाची दखल घेत कोरोना उपचार केंद्रातील उपचारांसह व्यवस्थापनाचा अभ्यास केला.

त्यामुळे केवळ नगर जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण राज्यात आ. लंके यांची लोकप्रियता वाढली. ती सहन न झाल्याने केवळ द्वेषभावनेतून खा. विखे त्यांच्यावर टीका करीत असल्याची भावना आ. लंके समर्थकांबरोबरच जिल्ह्यातील जनतेकडून व्यक्त होत आहे.

आ. लंकेे यांच्या कामामुळे, त्यांच्या लोकप्रियतेमुळे खा. विखे धास्तावले आहेत. आ. लंके लोकसभा निवडणुकीतील प्रबळ विरोधक असू शकतात, या भावनेतून खा. विखे संतूलन गमाऊन बसले आहेत. त्यांनी आ. लंके व आ. पवार यांच्यावर बिनबुडाची टीका करण्यास सुरुवात केली.

अहमदनगर लाईव्ह 24