आ. निलेश लंके म्हणाले शिवाजी महाराजांचे हे कौशल्य आत्मसात करा..

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:- छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यवस्थान कौशल्य तरुणांनी आत्मसात करावे, असे आव्हान आमदार नीलेश लंके यांनी केले.कान्हूरपठार (ता.पारनेर) येथे नीलेश लंके प्रतिष्ठान व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ३९१ वा शिवजयंती सोहळा साजरा करण्यात आला.

याप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, कुठलीही गोष्ट करण्यासाठी व्यवस्थापन फार महत्त्वाचे असते. महाराजांनी एवढे मोठे विश्व निर्माण करण्यासाठी केलेल्या व्यवस्थापन कौशल्याचा आदर्श घेऊन वाटचाल केल्यास जीवनात कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही.

शिवजयंती सोहळ्याची ऐतिहासिक परंपरा एकोप्याने चालू ठेवल्याबद्दल त्यांनी तरुणांचे आभार मानले. याप्रसंगी राष्ट्रवादी आयटी सेलचेप्रमुख जितेश सरडे, नगरसेवक विजूभाऊ औटी, चंद्रभान ठुबे, विजयानंद साळवे, प्रसाद नवले, अंकुश ठुबे, किरण ठुबे, सूरज नवले, संजू सोनावळे, शिवाजी व्यवहारे, बाळासाहेब नवले,

भागाजी ठुबे, प्रमोद खामकर, पोपट नवले, सचिन गाडीलकर, श्रीकांत ठुबे, भागा नवले, विलास महाराज लोंढे, शिवाजी शेळके, सचिन सोनावळे, विजय काकडे, बाजीराव नवले, किसन नवले, ज्ञानेश्वर ठुबे, तुकाराम लोंढे, सुहास शेळके, तुषार सोनावळे, तुषार ठुबे, अमित लोंढे, प्रशांत लोंढे, भानुदास ठुबे, हरिश्चंद्र व्यवहारे, प्रसाद खिलारी,

प्रशांत खामकर, बंडू सोनावळे, अरुण गायकवाड, किरण लोंढे, प्रशांत नवले, बापू भागवत, समर नवले, विलास व्यवहारे, निशांत ठुबे, अभिषेक चिर्क, श्रेयश गोरे, शुभम घोडके, यशदीप ठुबे, शुभम जेजुरकर, अभिषेक निमसे, नंदू सोनावळे, बाबू जडगुले, गणेश ठुबे, सखाराम ठुबे, भूषण गंधे उपस्थित होते.

अहमदनगर लाईव्ह 24