अहमदनगर Live24 टीम, 5 ऑगस्ट 2021 :- कोरोना काळातही विकास थांबला नाही. मतदार संघात विकास कामे सुरू आहेत. यापुढेही सुरू राहणार आहेत. माजी मंत्र्यांना संधी असताना विकास करता आला नाही.
हे त्यामुळे मतदार संघातील अनेक प्रश्न प्रलंबित राहिले, अशी टीका आमदार रोहित पवार यांनी माजी मंत्री राम शिंदे यांच्यावर नामोल्लेख टाळून केली. आपण आपल्या काळात मतदार संघ हायटेक करू, असेही ते म्हणाले. सध्या तालुक्यात दडपशाही केली जात आहे. व्याजांचा धंदा करणारे दमबाजी करत आहेत, अशी दमबाजी खपवून घेणार नाही.
मग गाठ माझ्याशी आहे. सर्वसामान्यांना होणारा त्रास मी खपवून घेणार नाही. माझ्या सारखा सामाजिक गुंड दुसरा कोणी नसेल, असा इशारा आमदार पवार यांनी यावेळी दिला. आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नांतून जामखेड येथे अत्याधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज बस स्थानक उभारले जात आहे.
नागरिकांच्या साेयीसाठी व्यापारी संकुलाचीही निर्मिती करण्यात येत आहे. मतदारसंघाच्या विकासासाठी आणि नागरिकांना अद्ययावत सुविधा प्राप्त करून देण्यासाठी आमदार पवार विविध विकासकामांच्या माध्यमातून नवे आयाम देत आहेत.
मंगळवारी जामखेड येथील बहुप्रतिक्षित बस स्थानक आणि व्यापारी संकुलाचे भूमिपूजन आमदार पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा विभाग प्रमुख विजय गिते,
कार्यकारी अभियंता कुलाळ, उपविभागीय अधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार विशाल नाईकवाडे, गटविकास अधिकारी परशुराम कोकणी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बोराडे, आर्किटेक्ट प्रविण पगार, विभाग अभियंता शितल शिंदे, मधुकर राळेभात, दत्तात्रेय वारे, सुर्यकांत मोरे आदी उपस्थित होते.