आ. शंकरराव गडाख यांनी सगळंच सांगितलं ! उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिल्याने…

Published by
Ahmednagarlive24 Office

Maharashtra News : समन्यायी पाणी वाटप कायद्याचे फेरनियोजन करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री, आ. शंकरराव गडाख यांनी केले. पाचेगाव व परिसराला वरदान ठरणाऱ्या बंधाऱ्याचे जलपूजन गडाख व मा. आ. भानुदास मुरकुटे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

गडाख म्हणाले, की पाचेगाव, पूनतगाव परिसरातील प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी रस्त्यावर उतरून कितीही मोठा संघर्ष करण्याची माझी तयारी आहे. पाचेगाव परिसरात रस्त्याचे कामही लवकरात लवकर पूर्ण होईल,

पाचेगाव बंधाऱ्यासाठी हक्काचे पाणी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, हक्काच्या प्रश्नासाठी सदैव संघर्ष करू. आपण उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिल्याने जाणीवपूर्वक तालुक्याला निधी देणे टाळले जात असल्याचा आरोप गडाखांनी केला.

मुरकुटे म्हणाले, की पाचेगाव, पुनतगाव येथील बंधारे भरल्याने पिकांना अडचण येणार नाही समन्यायी पाणीवाटप कायद्यातील पाण्याचे पुन्हा फेरनियोजन होणे गरजेचे आहे. त्यासाठी न्यायालयीन व रस्त्यावरचा संघर्ष करू पाटपाणी,

विजेसाठी सरकारविरोधात संघर्ष करावा. समन्यायी पाणी वाटपाचे फेरनियोजन करताना, निळवंडे धरणातून बंधारे भरण्यासाठी दोन-तीन टीएमसी पाणी राखीव करण्यासाठी गडाख यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न करू,

तुम्ही त्यास साथ द्या, असे आवाहन मुरकुटे यांनी केले. यावेळी पाचेगाव, पूनतगाव, इमामपूर, गोणेगाव, निंभारी, नेवासे बुद्रुक, खुपटी परिसरातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

दरम्यान, मराठवाड्याला जाणाऱ्या पाण्यातून आमदार शंकरराव गडाख यांनी विशेष प्रयत्नपूर्वक पाचेगाव, पुनतगाव बंधारे भरल्याने शेतकरी सुखावले आहेत. या पाण्यामुळे पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Ahmednagarlive24 Office