दिलासा : डीआरडीओच्या औषधामुळे कोरोना रुग्णांना लागणारी ऑक्सिजनची गरज कमी होणार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 9  मे 2021 :- डीआरडीओच्या औषधामुळे कोरोना रुग्णांना लागणारी ऑक्सिजनची गरज आता कमी होणार आहे. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने कसेरोनावर उपचारासाठी आणखी एका औषधाला मंजुरी दिली आहे.

हे औषध डीआरडीओच्या इंस्टीट्यूट ऑफ न्यूक्लियर मेडिसन अँड अलायड सायन्स आणि हैदराबाद सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजीने एकत्रितपणे तयार केलं आहे.

या औषधाला 2-deoxy-D-glucose (2-DG) असे नाव दिलं आहे. डीआरडीओने याबाबतची माहिती ट्विटरवर दिली आहे.

तसेच या औषधाच्या निर्मितीची जबाबदारी डॉ. रेड्डी लॅबोरेटरीजला देण्यात आली आहे. या औषधाचं क्लिनिकल ट्रायल यशस्वीपणे पार पडलं आहे.

ज्या रुग्णांना या औषधाची मात्रा दिली होती. ते रुग्ण लवकर बरे झाल्याचं दिसून आलं आहे. तसेच त्या रुग्णांना ऑक्सिजन गरज जास्त भासली नसल्याचंही निदर्शनास आलं आहे.

रुग्णही लवकर बरे होत असल्याचं समोर आलं आहे. दुसरीकडे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने करोना रुग्णांना दाखल करून घेण्याबद्दलच्या राष्ट्रीय धोरणात मोठे बदल केले आहेत.

रुग्णांला दाखल करुन घेण्यासाठी पॉझिटिव्ह टेस्ट सक्तीची असणार नाही. त्याचबरोबर रुग्ण कोणत्याही शहरातील असला, तरी करोना संशयित रुग्णाला कोविड केअर सेंटर, पूर्णपणे कोविड समर्पित सेंटर वा पूर्णपणे कोविड रुग्णालयांनी संशयित रुग्णाच्या विभागात दाखल करुन घ्यावं.

एकाही रुग्णाला कोणत्याही परिस्थिती दाखल करून घेण्यास नकार देता येणार नाही. यात ऑक्सिजन वा औषधी या देण्यास सुद्धा नकार देता येणार नाही, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24