अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :- कोरोना संसर्ग विषाणूला थांबवायचे असेल तर विलगीकरण कक्ष अत्यंत महत्त्वाचा आहे. नुकतेच वाळुंज येथील कोविड सेंटरमधील 18 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.
यावेळी सर्व रुग्णांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करून त्यांना निरोगी जीवन जगण्याच्या शुभेच्छा माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी दिल्या.
यावेळी बाजारसमितीचे उपसभापती संतोष म्हस्के, माजी सभापती हरिभाऊ कर्डिले, बाळासाहेब मेटे, दादा दरेकर, बाळासाहेब दरेकर, बाळासाहेब बेरड, रणजित लाळगे,
भाऊ पांडुळे, डॉ.अनिल ससाणे, डॉ.सविता ससाणे, आरोग्यसेविका योगिता चौकडे, उषा सावंत, वैशाली साळवे, विकास म्हस्के, डॉ.अमृत पारकड आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले पुढे म्हणाले की, कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस भयानक होत चालली आहे.
प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोना विषाणूचे लक्षणे जाणवल्यास जवळ असणाऱ्या आरोग्य केंद्रात जाऊन उपचार घ्यावे.
आपल्याला जर कोरोना विषाणूचा संसर्ग झाला असेल तर आपण आपल्या घरी किंवा आपल्या गावात गेल्यास इतरांनाही या कोरोना संसर्ग विषाणूची लागण होऊ शकते. हे थांबवण्यासाठी प्रत्येकाने विलगीकरण कक्षात राहणे गरजेचे आहे,
तरच आपण कोरोनाची लढाई जिंकू शकतो व प्रत्येकाच्या आरोग्य निरोगी व सुदृढ राहण्यास मदत होईल आम्ही तुमच्या बरोबर आहोत असे ते म्हणाले.