दिलासादायक… जिल्ह्यातील ‘या’ गावातील ८६ वर्षीय आजोबांची कोरोनावर मात

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2021 :-रूंभोडी येथील ८६ वर्षीय वृध्द काशिनाथ मालुंजकर यांनी प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर कोरोनावर मात केली आहे.

या कोरोना बाधिताने अकोले येथे खाजगी कोविड हॉस्पिटलमध्ये प५ दिवस उपचार घेतले. उपचार सुरू असताना त्यांनी आपल्या मुलांकडे मला घरी घेवून चला, मी घरीच बरा होईल असा हट्ट धरला.

मग त्यांच्या इच्छेवरून ऑक्सिजनपातळी ८५ असताना त्यांना घरी आणले गेले.त्या रात्री ते अंगणात झाडाखाली झोपले.

ऑक्सिजनपातळी ८० झाली.आग्रह करून देखील ते परत दवाखान्यात गेले नाही. दिवसभर झाडांच्या सावलीत झोपून राहिले आणि त्यांची ऑक्सिजनपातळी ९० झाली.

नंतर तिसऱ्या दिवशी ऑक्सिजन लेव्हल ९५ वर गेली.प्रबल सकारात्मक इच्छाशक्ती यामुळे हे शक्य झाले असावे.

त्यांनी या कालावधीत लिंबू आणि लिंबू सरबत याचे खुप सेवन केल्याचे समजते. आता दहा- बारा दिवस झाले असून त्यांची प्रकृती ठणठणीत झाली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24