दिलासादायक ! रुग्णसंख्या घटल्याने जिल्हा अव्वलवरून नवव्या स्थानावर

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 12 मे 2021 :-नगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला होता. यामुळे दरदिवशी जिल्ह्यात बाधितांची संख्या हजारोंच्या घरात आढळून येत होती.

यामुळे नगर जिल्हा बाधितांच्या संख्येत प्रथम स्थानी पोहचला होता. मात्र आता जिल्हावासीयांसाठी एक दिलासादायक माहिती समोर येत आहे.

जिल्ह्यात मंगळवारी पुन्हा एकदा कोरोनाची दैनंदिन रुग्णसंख्या घटली आहे. पहिल्या क्रमांकावर असणारे अहमदनगर शहर थेट नवव्या क्रमांकावर गेले असल्याने शहराला मोठा दिलासा मिळाला आहे.

दुसरीकडे जिल्ह्याच्या दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे. नगरमध्ये केवळ १९५ इतके रुग्ण आढळून आले आहेत.

जिल्ह्यात मंगळवारी ३,९३६ इतक्या सर्वाधिक रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ८७ हजार १०७ इतकी झाली आहे.

जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती आकडेवारीमध्ये

  • बरे झालेली रुग्णसंख्या :१,८७,१०७
  • उपचार सुरू असलेले रुग्ण : २७,०८६
  • मृत्यू : २,३६५
  • एकूण रुग्णसंख्या : २,१६,५५८
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24