दिलासादायक ! नेवासा तालुक्यात तब्बल 10 हजार जण झाले कोरोनामुक्त

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :- गेल्या वर्षभरापासून जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. यातच जिल्ह्यातील सर्व तालुक्यात कोरोनाने हातपाय पसरले आहे. यातच आता काहीसे दिलासाजनक परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे.

जिल्ह्यातील काही गाव कोरोनामुक्त झाले आहे तर काही गावांची वाटचाल कोरोनामुक्तीकडे चालू आहे. नेवासा तालुक्यात आतापर्यंत दहा हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

मागील वर्षी मार्च महिन्यात जिल्ह्यातील दुसरा कोरोना बाधित रुग्ण नेवासा तालुक्यात आढळून आला होता. त्यानंतर तालुक्यातील विविध गावांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाला होता.

यंदा एप्रिल महिन्याच्या सुरूवातीपासून तालुक्यातील ११८ पेक्षा जास्त गावांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला होता. गेल्या वर्षभरात तालुक्यात ११ हजार ५ कोरोना बाधित आढळले आहे .

मात्र आता रुग्णवाढी बरोबरच कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाणही मोठे असल्याचे ही दिलासादायक बाब ठरत आहे. सध्या ६७२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24