अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :- गेल्या २४ तासांत तब्बल ३६ हजार १७६ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट ९२.७६ टक्क्यांवर गेला आहे.
तसेच गेल्या २४ तासांत राज्यांत एकूण २४ हजार १३६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यांत ६०१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
तसेच ३६ हजार १७६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण ५२ लाख १८ हजार ७६८ रुग्ण बरे झाले आहेत. आताच्या घडीला राज्यातील मृत्यूदर १.६१ टक्के इतका आहे.
राज्यातील उपचाराधीन रुग्णांची एकूण ३ लाख १४ हजार ३६८ आहे. दरम्यान, राज्यात एकूण ३ कोटी ३५ लाख ४१ हजार ५६५ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.
त्यापैकी ५६ लाख २६ हजार १५५ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. राज्यात २६ लाख १६ हजार ४२८ जण गृह विलगीकरणात आहेत. तर, २० हजार ८२९ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.