अहमदनगर Live24 टीम, 28 एप्रिल 2021 :-केंद्र सरकारने सोमवारी सीरम इंस्टीट्यूट आणि भारत बायोटेक या कंपन्यांकडे कोविड-19 लसीच्या किंमती कमी करण्याची मागणी केली होती.
त्यानंतर आज सीरम इंस्टीट्यूटचे आदर पुनावाला यांनी लसीच्या किंमती कमी करत असल्याचं जाहीर केलं आहे.
सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदार पुनावाला यांनी ट्विट करत कोव्हिशिल्डची किंमत कमी केल्याची माहिती दिली आहे.
यापूर्वी राज्यांनी लशींच्या दराबाबत केंद्राकडे तक्रार केली होती. पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटने कोव्हिशिल्डची किंमत राज्यांसाठी 100 रुपयांनी कमी केली आहे.
त्यामुळे राज्यांना कोव्हिशिल्ड ही 400 रुपये ऐवजी 300 रुपयांना मिळणार आहे. दरम्यान लसीची किंमत कमी केल्याने राज्यांचे कोट्यवधी रुपये वाचणार आहे.
त्यामुळे अधिकाधिक लसीकरण होणे शक्य आहे. त्यामुळे अगणित लोकांचे जीव वाचू शकणार आहेत, असे आदार पुनावाला यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.