अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- कोरोनाची दुसरी लाट बऱ्यापैकी ओसरताना दिसत आहे.मात्र, कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा कहर वाढताना दिसत आहे.
महाराष्ट्रातही या प्रकाराचे रुग्ण आढळून आले आहे. परंतु, याबाबत एका दिलासादायक आणि चिंतामुक्त करणारी माहिती सीएसआयआरचे प्रमुख डॉ. शेखर मांडे यांनी दिली आहे.
कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरियंट धोकादायक नसल्याचा दावा डॉ. मांडे यांनी केला आहे. कोरोनाच्या डेल्टा आणि डेल्टा प्लस या व्हेरिएंटची देशभरातील अनेकांना लागण झाल्याची माहिती मिळाली आहे.
या व्हेरिएंटचा लहान मुलांवर अधिक परिणाम होत असल्याचेही सांगितले जात आहे. मात्र, डेल्टा व्हेरिएंट घातक नसल्याचा दावा सीएसआयआरचे प्रमुख डॉ. शेखर मांडे यांनी केला आहे.
तसेच यासंदर्भातील एक अहवाल केंद्र सरकारला पाठवला असल्याचे समजते. डेल्टा प्लस धोकादायक नाही. त्याचा लहान मुलांवरदेखील परिणाम होत नाही. सीएसआयआरच्या शास्त्रज्ञांनी यावर संशोधन केले आहे.
डेल्टा प्लस व्हेरिएंट घातक नसल्याचा अहवाल सीएसआयआरच्या शास्त्रज्ञांनी केंद्र सरकारला पाठवला आहे. लोकांनी डेल्टा प्लसला घाबरू नये. डेल्टा प्लस घातक असल्याचे कोणतेही पुरावे नाहीत.