अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- गेल्या काही दिवसांपासून नगर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची विक्रमी नोंद होत होती. बाधितांची आकडेवारी थेट साडेचार हजारांच्या पार गेली होती.
मात्र आता काहीसे दिलासादायक चित्र जिल्ह्यात निर्माण झाले आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या घटत आहे तर दुसरीकडे कोरोनामुक्त होणार्यांची संख्या देखील वाढली आहे.
तसेच दिलासादायकबाब म्हणजे जिल्ह्याचा रुग्ण रिकव्हरीचा रेट देखील चांगलाच सुधारला आहे. दरम्यान गेल्या २४ तासात जिल्ह्यात ३,१५६ रुग्णांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले,
तर नव्या २,१६१ बाधितांची रुग्णसंख्येत भर पडली. सलग दुसऱ्या दिवशी दैनंदिन रुग्णसंख्या निम्यावर कमी झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख १४ हजार ३४६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९०.८६ टक्के इतके झाले आहे.
दरम्यान, आज जिल्ह्याच्या रुग्णसंख्येत २,१६१ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १९ हजार ३९ इतकी झाली आहे.