दिलासादायक ! राज्याचा रिकव्हरी रेट 97 टक्क्याहून अधिकवर पोहचला

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 11 सप्टेंबर 2021 :-  राज्यात करोना रुग्णसंख्या कमी झाल्याचं दिसत आहे. गेल्या २४ तासात राज्यात ३ हजार ७५ रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसातील सर्वात कमी रुग्णसंख्या आज नोंदवली गेली आहे.

दुसरीकडे ३ हजार ५६ रुग्णांनी करोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात सुरू असलेला करोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव काहीसा ओसरताना दिसत आहे.

निर्बंध शिथिल केल्यानंतर गेल्या काही दिवसात रुग्ण संख्येत किंचित वाढ झाली होती. मात्र कोरोनमुक्त होणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे. राज्यात आज 3 हजार 056 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण 63 लाख 2 हजार 816 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97.05 टक्के इतके झाले आहे.

राज्यात दिवसभरात 35 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर 2.12 टक्के इतका आहे. राज्यात सध्या 49 हजार 796 रुग्ण सक्रिय आहेत.

राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 58 लाख 36 हजार 107 रुग्णांपैकी 64 लाख 94 हजार 254 जणांना करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यामुळे करोना पॉझिटिव्ह येण्याचं प्रमाण हे 11.63 टक्के इतकं आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!