अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :-आज कोरोनामुळे सर्वच हॉस्पिटल गच्च भरले असताना, अनेक रुग्णांचे नातेवाईक हॉस्पिटलमध्ये बेड मिळण्यासाठी तर ऑक्सिजन व रेमडेसिविर इंजेक्शनसाठी पळापळ करताना दिसत आहेत.
मात्र कोरोना रुग्णांवर होमिओपॅथी उपचार पध्दती संजीवनी ठरली असून, शहरातील मोठ्या संख्येने रुग्ण होमिओपॅथीच्या औषधाने बरे झाले आहेत.
नागरिकांनी कोरोनाची लक्षणे आढळल्यास घाबरुन न जाता त्वरीत तपासणी करुन उपचार घेतल्यास हा आजार बरा होत असल्याची माहिती होमिओपॅथी तज्ञ डॉ. प्रमोद लंके यांनी दिली. जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढले आहे.
अनेक रुग्ण दगावत असताना सर्वसामान्यांमध्ये या आजाराची मोठी दहशत निर्माण झाली आहे. नागरिक कोरोनाची लक्षणे आढळून आल्यानंतर देखील तपासणी न करता, निष्काळजीपणा करत असल्याने कोरोनाचे संक्रमन वाढत आहे.
तर हा आजार जीवघेणा ठरत आहे. कुठल्याही विषाणूजन्य आजारात ताप येणे हे त्याचे सर्वसामान्य लक्षणे असते. परंतु बहुतांश लोकांना ताप आल्यास ते घाबरून जातात व ताप घालवण्यासाठी वेगवेगळे उपचार करतात.
जो ताप रुग्णांचे रक्षण करण्यासाठी शरीराने आणलेला आहे. तो ताप त्या विषाणूला रुग्णांमध्ये अति संक्रमण करू देत नाही. म्हणून पहिल्या टप्प्यात बहुतांशी रुग्णांमध्ये ताप गेला की, रुग्णाला निमोनिया होण्याची भीती वाढते.
ही प्रक्रिया सर्वच रुग्णांमध्ये होते असे नाही. यातील वेगवेगळ्या रुग्णांचे वर्गीकरण करणे आवश्यक आहे. होमिओपॅथी औषध अचूक निवडल्यावर रुग्णांचा असणारा ताप एका उच्च बिंदूपर्यंत वाढून तो नाहीसा होतो व रुग्ण या आजारातून बरा होत
असल्याचे निदर्शनास आले आहे. कोरोनाने बाधित झालेले संपुर्ण कुटुंब होमिओपॅथी औषधाने बरे झाले आहेत.
त्यापैकी एकाची गंभीर परिस्थिती निर्माण होऊन निमोनिया झालेला रुग्ण पंधरा दिवसांनी विना ऑक्सिजनने बरा झाला. अनेक कोरोना रुग्ण ठणठणीत होत असल्याने होमिओपॅथी उपचार घेण्याकडे सर्वसामान्य नागरिकांचा कल वाढला असल्याचे डॉ. लंके यांनी सांगितले.