संदेशनगरला बंद गटार पाईप योजना कामाचा शुभारंभ

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- कुठल्याही क्षेत्रात काम करताना मनाची तयारी पाहिजे मनात कामाचे ध्येय ठेवले कि ते साध्य होण्यास वेळ लागत नाही. धार्मिक कार्यातून समाजसेवेची प्रेरणा मला मिळाली अध्यात्मिक कार्यास चालना मिळाली,

यामुळे नागरिकांचे प्रश्न सोडविणे हेच ध्येय ठेवून नगरसेवक पद सर्वसामान्य नागरिकांनी मला दिले, त्या पदाचा उपयोग त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करायला मी बांधिल आहे, असे प्रतिपादन नगरसेवक सुनिल त्र्यंबके यांनी केले. वसंत टेकडी जवळील संदेशनगर परिसरातील बंद गटार पाईप योजना कामाचा शुभारंभ नगरसेवक त्र्यंबके यांचे हस्ते करण्यात आला.

यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी नगरसेवक विनित पाउलबुधे, माजी नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार, योगेश पिंपळे, उद्योजक बबलू सुर्यवंशी, अविनाश निक्रड, सागर मेट्टू, बाबासाहेब सुर्यवंशी, सुरेश देशमुख, अमोल शिंदे,

सतीश पवार, सतीश गायकवाड, अमर मेट्टू, बबन धनवडे, रौफ शेख, अभिजित कुलकर्णी, अंजुम शेख, अकिल शेख आदि उपस्थित होते.

नगरसेवक त्र्यंबके पुढे म्हणाले, आमदार संग्राम जगताप यांच्या निधीतून लवकरच सर्व डि.पी. रस्त्यांचे कॉक्रीटीकरण फेज-2 मुळे पाणीप्रश्न व सर्व कॉलनीतील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण करुन स्ट्रीट लाईटचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे, असे सांगितले.

यावेळी निखिल वारे म्हणाले, आम्ही चारही नगरसेवक एकत्रित काम करतो, कोणी कार्यसम्राट न म्हणता आम्ही फक्त काम करणारे नगरसेवक आहोत, कामे करणे हे आमचे कर्तव्य आहे.

बाळासाहेब पवार यावेळी म्हणाले, आमची ही चौकट शहराची ओळख झाली आहे. प्रभाग दोन मध्ये चार नगरसेवक हे समीकरण विकासासाठी प्रसिद्ध होत आहे.

आम्ही कोठे गेलो व एक जण जरी नसला तर चौथा कुठे गेला अशी विचारणा होते, असे सांगताच नागरिकांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला. प्रभाग दोनच्या विकासासाठी या चारही नगरसेवकांचे एकमत असल्याने पुढील निवडणुकीत नागरिक त्यांच्या पाठिशी राहतील, असे महेश जगदाळे यावेळी म्हणाले.

यावेळी संदेशनगरच्या नागरिकांनी सुनिल त्र्यंबके यांचा वाढदिवस केक कापून साजरा केला. यावेळी सौ.गांधी, सौ.देशमुख, सौ.जगदाळे आदिंसह नागरिक उपस्थित होते.

Ahmednagarlive24 Office