अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- शहराच्या पाणी योजनेसह विविध विकासकामे मार्गी लावून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटीबद्ध असल्याचे आमदार नीलेश लंकेे यांनी सांगितले.
पारनेर-जामगाव रस्त्यावरील मणकर्णिका नदीवर उभारण्यात येणाऱ्या पुलाचे भूमिपुजन आमदार लंके यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना आमदार लंके यांनी शहर विकासासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली. दरम्यान पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त सकाळी पक्षाचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब तरटे यांच्या हस्ते आमदार लंके यांच्या संपर्क कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले.
अशोक सावंत, सुवर्णा धाडगे, अशोक रोहोकले, किसन रासकर, दत्तात्रेय खोडदे, डॉ. आबासाहेब खोडदे, विक्रम कळमकर, वकील राहुल झावरे, दिनेश औटी, विलास सोबले, विजय औटी, साहेबराव देशमाने,
श्रीकांत चौरे, अमित जाधव, नंदकुमार देशमुख, संजय मते, उमाताई बोरूडे, बाळासाहेब औटी आदी उपस्थित होते. आमदार लंके म्हणाले, ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या धोरणानुसार आम्ही मतदार संघात काम करीत आहोत.
करोनाच्या दोन्ही लाटांमध्ये आपणासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कोविड उपचार केंद्रासह विविध माध्यमातून समाजाची सेवा केली.
यापुढेही पारनेर तालुक्यासह मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध आहे, असे आमदार नीलेश लंके यांनी यावेळी सांगितले.