राष्ट्रवादी काँग्रेसची ध्येयधोरणे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवा : राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहाेचवण्याचे काम संघटनेच्या माध्यमातून करावे, असे आवाहन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले.

राहुरी शहरातील दीपक आनंदा साळवे यांची राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली. या निवडीचे पत्र राज्यमंत्री तनपुरे यांच्या हस्ते साळवे यांना देण्यात आले.

पदाच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही दीपक साळवे यांनी यावेळी दिली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष अभिजित ससाणे, उपाध्यक्ष अंबादास शिंदे, सरचिटणीस प्रदीप ससाणे, अशोक आहेर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष आघाव, संजय साळवे, ज्ञानेश्वर जगधने, नवीन साळवे, दादू साळवे, सुभाष साळवे अादी उपस्थित होते.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24