‘या’ काळात केवळ तक्रारी करून चालणार नाहीत : ना. थोरात

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2021 :-कोरोनाच्या काळात केवळ तक्रारी करुन भागनार नाही. कोरोनाच्या संकटाला सामोरे जाताना आरोग्य, महसुल , पोलिस व पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी व स्थानिक कार्यकर्त्यांनी समन्वयाने काम करावे.

कोवीडच्या तपासण्या वाढविणे गरजेचे आहे. लसीकरणाचा वेग वाढवा लागेल असे आवाहन महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

पाथर्डी येथे ते आढावा बैठकित ते बोलत होते. कोरोना परिस्थीती गंभीर होत असताना तालुका प्रशासनाला परस्थीती हाताळण्यात अपयश येत आहे. कोवीड बाबतीत जिल्हाधिका-यांनी केलेल्या सुचनांचे स्थानिक अधिकारी पालन करीत नाहीत.

चाचणीनंतर बाधीत निघालेल्या रुग्णांची हेळसांड होताना दिसते आहे. महसुलमंत्र्यासमोरच सुचनावजा तक्रारीचा पाऊस पडल्याने पदाधिकारी व अधिकारी अवाक झाले. तुमच्या सुचनांचा आदर करुन

कोरोनाशी लढताना अधिकारी व कर्मचारी कार्यकर्त्यांनी समनव्याने काम करावे असे थोरात यांनी सांगितले. कोरोना बाधीतांची होणारी हेळसांड, लसीकरणाला लागणा-या रांगा, ऑक्सिजन व रेमडीसिव्हीरचा तुटवडा याबाबत बहुतेक कार्यकर्त्यांनी तक्रारी केल्या.

परस्थीती गंभीर आहे. आहे त्या मनुष्यळामध्ये कोरोनाचे संकट परतावयाचे आहे. काळजी घेवुन नियांचे पालन करावे.

कोरोना होवु नये याचीच काळजी घ्यावी. आशा सूचना ना. थोरात यांनी केल्या. यावेळी मनसे व भाजपाच्या कार्यकर्त्यांनी ना. थोरात यांच्या समोर सुचनांचा पाऊस पाडला.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24