अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :- कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या वर्षभरापासून सुरूच आहे. किंबहुना वर्षाहून अधिक दिवसांपासून कोरोना विषाणूने देशाला जेरीस आणून सोडले आहे. यामुळे अनेकदा लॉकडाऊन करण्यात आला होता.
तसेच अद्यापही निर्बंध कायम आहे. यातच कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव पाहता भारतातील केरळ या राज्याने पुन्हा एकदा संपूर्ण लॉकडाऊन घोषित केला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशात हाहाकार माजवला होता.
परंतु देशाच्या अनेक भागांमध्ये आता दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. परंतु सध्या केरळमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केरळमध्ये पुन्हा एकदा संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.
परंतु केरळमध्ये २४ आणि २५ जुलै रोजीच लॉकडाऊन लागू राहणार आहे. दरम्यान २४ आणि २५ जुलै रोजी १२ आणि १३ जून रोजी जारी करण्यात आलेलेच निर्देश लागू राहणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.
केरळमध्ये गेल्या चोवीस तासांमध्ये गेल्या २५ दिवसांमधील सर्वाधिक १६,८४८ नव्या रुग्णांची नोंद झाली. यापूर्वी ५ जून रोजी राज्यात १७,३२८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. दरम्यान, संपूर्ण देशात नव्या रुग्णांच्या झालेल्या नोंदीपैकी ४० टक्क्यापेक्षा अधिक रुग्ण हे केरळमध्येच सापडले आहेत.