31 जुलैपर्यंत प्रवेश उरकून 1 ऑगस्टपासून ऑनलाईन वर्ग भरवा…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,15 जुलै 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक व्यवस्थेवर खूप मोठा परिणाम झाला आहे. परीक्षांचा गोंधळ, प्रवेश प्रक्रिया, एंट्रन्स परीक्षा आदींबाबत अनिश्चितता निर्माण झाली.

परंतु आता वरिष्ठ महाविद्यालयांनी उर्वरीत वर्गांची प्रवेश प्रक्रिया 31 जुलैपर्यंत उरकून 1 ऑगस्टपासून ऑनलाईन वर्ग सुरू करावेत असे

विद्यापीठाचे निर्देश आल्यानंतर नगर शहरातील काही महाविद्यालयांत आजपासून (बुधवार) प्रवेश प्रक्रियेस सुरुवात होणार आहे. 20 जुलैपर्यंत पदवीच्या प्रथम, द्वितीय,

तसेच पदव्युत्तरच्या प्रथम, शिवाय इतर व्यावसायिक अयासक्रमाचे प्रथम, द्वितीय वर्षाचे निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यात मंगळवारी काही वर्गांचे निकाल विद्यापीठाने जाहीर केले आहेत.

त्यामुळे वरिष्ठ महाविद्यालयांतील वर्गांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरूवात होत आहे.यंदाची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन आहे. प्रत्येक महाविद्यालयाने आपापल्या संकेतस्थळावर त्याची तयारी करून ठेवली आहे.

31 जुलैपर्यंत या वर्गांचे प्रवेश उरकून 1 ऑगस्टपासून ऑनलाईन वर्ग भरवण्याचे निर्देश विद्यापीठाने दिले आहेत.

निकाल लागताच संकेतस्थळावरून अर्ज उपलब्ध होतीत. हे अर्ज ऑनलाईन भरून आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन जोडून व त्याचे प्रवेश शुल्कही ऑनलाईनच भरायचे आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24