अहमदनगर Live24 टीम, 7 जुलै 2021 :- पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील आरोग्य उपकेंद्रातील अधिकारी डॉ. गणेश गोवर्धन शेळके (वय ४०) यांनी लसीकरण सुरु असतानाच
कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली.
या प्रकरणी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे.
चौकशी अहवाल आल्यानंतर संबंधितावर कारवाई करण्यात येईल अशी, माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
पाथर्डी तालुक्यातील करंजी आरोग्य उपकेंद्रात असलेले समुदाय अधिकारी डॉ. गणेश गवर्धन शेळके यांनी कार्यालयातच गळफास घेऊन मंगळवारी आत्महत्या केली होती.
दरम्यान शेळके यांच्याकडे एक सुसाईड नोट आढळून आली असून, त्यात तालुका आरोग्य अधिकारी, तहसीलदार, जिल्हाधिकारी यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे म्हटले. याप्रकरणाची नगरचे पालकमंत्री हसन मुश्रिफ यांनी दखल घेतली आहे.
या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून तालुका वैद्यकीय अधिकार्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. डॉ. शेळके यांच्या मृत्यूस कारणीभूत असणार्यावर चौकशी अहवाल आल्यानंतर कारवाई केली जाईल, असे पालकमंत्री यांनी सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांबाबत पालकमंत्री म्हणाले… :- शेळके यांच्याकंदील सुसाईड नोटमध्ये तालुका आरोग्य अधिकारी, तहसीलदार, जिल्हाधिकारी यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे म्हटले होते.
pचिठ्ठीत ज्यांची नावे होती त्यांची चौकशी होईल, असे पालकमंत्री हसन मुश्रिफ यांनी म्हटले आहे. तसेच, याप्रकरणाशी जिल्हाधिकारी यांचा थेट संबंध नाही, येथील पगार तीन महिन्यापासून थकले होते, असेही त्यांनी सांगितले.