साईंच्या दर्शनाकरता ऑनलाईन दर्शनपासची सक्ती

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:- राज्य शासनाच्या आदेशान्वये दिनांक 16 नोव्हेंबरपासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी काही अटी/शर्तींवर खुले करण्यात आलेले आहे.

अजुन करोनाचे सावट संपले नसुन सध्या करोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवुन सर्व साईभक्तांनी आपल्या आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेणे आवश्यक आहे.

करोना विषाणुच्या संकटामुळे श्रीं च्या दर्शनाकरीता ठरावीक संख्येनेच मंदिरात प्रवेश दिला जात आहे. साईंच्या दर्शनाकरीता साधारणपणे 15000 भाविकांना दर्शन देता येईल.

त्यामुळे साईभक्तांनी दर्शनाचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन दर्शनपास घेवुनच यावे, असे आवाहन श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने करण्यात आलेले आहे.

दरम्यान साईबाबा मंदिरात गर्दी होवु नये म्हणुन सलग 02 किंवा 02 पेक्षा जास्त दिवस सलग सुट्टीचे कालावधीत तसेच गुरुवार, शनिवार, रविवार व शासकीय सुट्टी

अथवा महत्वाचे धार्मिक दिवशी साईबाबांचे दर्शन घेऊ ईच्छिणा-या साईभक्तांनी या कालावधीत शिर्डी येथे श्रीं चे दर्शनाकरीता येतानी संस्थानच्या online.sai.org.in या संकेतस्थळावरुन आगाऊ ऑनलाईन दर्शनपास घेवुनच यावे.

ऑनलाईन पास निश्चित झाल्यानंतरच शिर्डी प्रवासाचे नियोजन करावे. online.sai.org.in या वेबसाईटद्वारे सशुल्क दर्शनपास नियोजित दर्शन तारखेची आरक्षण सुविधा आरक्षण केल्याचे तारखेपासून पुढील 05 दिवसांसाठी तसेच मोफत दर्शनपास नियोजित दर्शन तारखेची आरक्षण सुविधा आरक्षण केल्याचे तारखेपासून पुढील 02 दिवसांसाठी उपलब्ध असेल.

अधिक माहितीसाठी संस्थानच्या www.sai.org.in या संकेतस्थळावर संपर्क करावा. सर्व साईभक्तांनी आपली होणारी गैरसोय टाळण्याकरीता ऑनलाईन दर्शनपास उपलब्ध करुन निर्धारीत वेळेत श्रीं च्या दर्शनाकरीता यावे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24