अतिक्रमणधारकांवर पालिकेची कारवाईची संक्रांत

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 11 मार्च 2021:- जिल्ह्यातील अतिक्रमणाचा मुद्दा हा नेहमीच चर्चेचा आणि वादाचा ठरत असतो. मात्र अशा अतिक्रमण धारकानावर कारवाई करून रस्ता मोकळा करण्याचे काम पालिका प्रशासनाला करावे लागत असते.

नुकतेच श्रीरामपूर शहरातील संगमनेररोड, नेवासा रोडवर जी अतिक्रमणे झाली आहेत ती अतिक्रमणे काढण्याची मोहीम नगरपरिषदेच्यावतीने राबविण्यात आली आहे.

या अतिक्रमण मोहिमेची सुरुवात काल नेवासा रोडवरील पोस्ट कार्यालयासमोरुन करण्यात आली असून ते हनुमानमंदिरासमोर पर्यंतची अतिक्रमणे काढण्यात आली आहेत.

यावेळी काही व्यावसायिक व अतिक्रमण पथकाबरोबर चांगले वादही झाले. मात्र अतिक्रमण पथकाने कोणत्याही विरोधाला न जुमानता अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरुच ठेवली आहे.

संगमनेररोड व नेवासा रोडची सर्व अतिक्रमण हटविले जाणार आहे. ही अतिक्रमणे काढतांना कोणताही दुजाभाव केला जाणार नाही, अशी माहिती अतिक्रमण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24