तंबाखूजन्य साठा जप्त; दोघांवर गुन्हा दाखल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 9 एप्रिल 2021 :- राहाता तालुक्यातील कोल्हार या ठिकाणी अन्न सुरक्षा व अन्न प्रशासन विभागाने छापा टाकून तंबाखुजन्य पदार्थ जप्त केला आहे.

याप्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, कोल्हार येथे गुरुवारी अन्नसुरक्षा व अन्नप्रशासन विभागच्या विभागाने छापा टाकून 52 पॅकेट सुपारी, 6 पॅकेट हिरा पानमसाला,

9 पॅकेट तंबाखू असा माल पकडला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी शेख व तांबोळी यांना ताब्यात घेतले आहे.

याप्रकरणी राजेश बढे यांनी लोणी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी हर्षद अनिस शेख, (रा. आत्तार गल्ली, कोल्हार ब), व नदीम शौकत तांबोळी, (रा. आत्तार गल्ली, कोल्हार) यांच्याविरुद्ध लोणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24