लसीकरणाचा गोंधळ ; 50 डोससाठी तीनशेहून अधिकांची नोंदणी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 12 मे 2021 :-जिल्ह्यातील लसीकरणाचा तुटवडा कायम असून यामुळे निर्माण होणार गोंधळ देखील कायमच आहे. यातच महापालिकेच्या वतीने कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस दिला जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते.

यामुळे नागरिकांनी भल्या सकाळीच रांगा लावल्या होत्या. मात्र पुरेशी लस उपलब्ध नसल्याने लस मिळाला नाही. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त करत गोंधळ घातला.

दरम्यान, पोलिसांना पाचारण करण्यात आल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.

कोव्हॅक्सिन लस मिळणार असल्याने नागिरकांनी महापालिकेच्या सर्वच आरोग्य केंद्रांवर गर्दी केली होती. परंतु, डोस 50 आणि नावनोंदणी 300 ते 400 ,अशी अवस्था होती.

त्यामुळे एकच गोंधळ उडाला. संतप्त नागरिकांनी प्रशासनाला जाब विचारला असता वरिष्ठांचा आदेश असल्याने निम्मे डोस इतरत्र पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले.

तासन्‌तास रांगेत उभे राहून डोस न मिळाल्याने नागिरकांनी संताप व्यक्त करत गोंधळ घातला. परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे दिसताच पोलिसांना पाचारण करण्यात आले.

पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने गर्दी नियंत्रणात आली. पुरेसे डोस उपलब्ध न झाल्याने प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24