नगर तालुक्यातील ‘त्या’ गावात लसीकरणावरून गोंधळ!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :-    नगर तालुक्यातील बहिरवाडी येथे लसीकरण मोहीम सुरू असताना मोठा गोंधळ उडाल्याने काही वेळ लसीकरण बंद ठेवण्यात आले होते.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जेऊर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या बहिरवाडी येथे लसीकरण कॅम्प चे आयोजन करण्यात आले होते.

१४० डोस असलेल्या लसीकरण कॅम्प च्या दरम्यान बहिरवाडी ग्रामस्थ व परिसरातील इतर गावांच्या नागरिकांमध्ये लसीकरणावरून गोंधळ निर्माण झाला होता.

बहिरवाडी ग्रामस्थांनी बाहेरगावच्या नागरिकांना लसीकरण करण्यासाठी मज्जाव केला तर जेऊर येथील नागरिकांनी जेऊर आरोग्य केंद्रात लसीकरण असताना बहिरवाडी चे ग्रामस्थ लस घेण्यासाठी येतात

तर आम्हाला येथे लस का मिळत नाही अशी भूमिका घेतली. यावरून मोठा गोंधळ उडाल्याने हतबल होत आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरण बंद केले.

अहमदनगर लाईव्ह 24