‘या युवा नेत्याला ना.तनपुरे यांनी दिल्या राजकीय वाटचालीस शुभेच्छा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- धनु तुझं पुढच वर्ष महत्वाचे आहे.चांगली बॅटींग होऊ दे,मी तुझ्या पाठीशी आहे.असे म्हणत नामदार प्राजक्त तनपुरे यांनी पुढील वर्षी होणा-या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी धनराज गाडे यांना राजकिय ताकद देण्याचे जाहीर केले आहे.

बारागाव नांदुर जि.प.गटाचे सदस्य धनराज शिवाजी गाढे यांच्या वाढदिवसानिमित्त नांदुर मध्ये विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

प्रमुख उपस्थितीत राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे बोलत होते.धनराज कमी वयात असताना देखील विधानसभा निवडणूकीवेळी विविध पक्षांकडून ऑफर आलेल्या असतना देखील प्रलोभनाच्या बळी न पडता

त्यानी वडिलांच्या विचारांच्या पावलावर पाऊल ठेवत माझ्या पाठीशी ठाम उभे राहिला आणि माझ्या विजयला हातभार लावला आहे.

माझ्या विजयामधे त्याचा खुप मोठा मोलाचे सहभाग आहे.धनराजने मला जी ताकत दिली ती खुप मोलाची होती.भविष्यात धनंजयच्या पाठीशी मी ठाम उभा रहाणार आहे.

त्यामुळे चांगली बॅटींग कर असा आशीर्वाद देखील मंञी तनपुरेंनी धनराज गाडे यांना दिला आहे. बारागाव नांदुर गावासाठी एक कोटी रूपयांचा विकास कामांचा निधी दिली आहे.

तर धनराज देखील आपल्या गटात भरीव कामे केली आहे.त्यामुळे भविष्यात निश्चितच वडीलांचे नाव ते पुढे नेईल असा आशावाद तनपुरे यांनी व्यक्त केला.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24